राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना वतीने प्रतिमा पूजन



सिंदखेड - अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना शिंदखेडा यांच्या वतीने शिंदखेडा पोलिस स्टेशन या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची १६ जून तारखेप्रमाणे पुण्यतिथी निमित्त पोलिस निरिक्षक दिपक पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना राजमाता जिजाबाई यांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यास आली.


अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना शिंदखेडा तालुका महिला पदाधिकारी शिंदखेडा तालुका अध्यक्ष शोभा पाटील, उपाध्यक्ष रितांजली गिरासे, सचिव रीना मुकेश वाघ तसेच शिंदखेडा तालुका अध्यक्ष जितेंद्र राजपूत, सचिव मुकेश वाघ, प्रसिद्धी प्रमुख भूषण पवार तसेच सह सचिव दिनेश गोसावी अखिल भारतीय पोलीस हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्रीनिवास इंदुरकर व धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम चे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनवणे यांनी केले.



या कार्यक्रमास अनेक पोलिस बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.सर्व पोलिस बांधवांनी 

अखिल भारतीय पोलीस हक्क संघटनेच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments