सोलापूर (प्रतिनिधी ) शहर पोलीस आयुक्तालयात 7 पोलीस ठाण्यापैकी एक असलेले जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सध्याची इमारत कमकुवत आणि जीर्ण झालेली आहे,तसेच जागाही कमी पडत असल्याने,पोलीस आयुक्तालयाच्या नव्या जागेचा शोध सुरू करण्यात आला त्यामध्ये जुना तुळजापूर नाका परिसरातील डी मार्ट जवळील महापालिकेच्या 3 जागा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांसह पाहिली. या 3 पैकी एक जागा निश्चित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे गौहर हसन,सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन,वाहतूक शाखा आणि जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी पोलीस निरीक्षक शबनम शेख तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments