बचत गटांनी उत्पादनांच्या दर्जा बरोबरच मार्केटिंगचे कसंब अवगत करावे सीईओ दिलीप स्वामी


  सोलापूर (प्रतिनिधी )


उमेद अभियानातील तालुका व्यवस्थापक आणि जिल्ह्यातील बचतगटाच्या महिला अध्यक्ष यांची बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनाची बैठक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना सीईओ स्वामी बोलत होते. मागील दोन वर्षात बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अनुक्रमे एक व दोन नंबरवर आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले परंतु बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली तरच दोन वर्षांत केलेल्या कामाचे चीज होईल. बचतगटांनी उत्पादनांचे पॅकेटींग आकर्षक हवे, उत्पादनांची परिणामकारक जाहिरात करण्यावर भर दिला पाहिजे. बचतगटांनी विक्री केलेली उत्पादने व त्या उत्पादनांना आलेला उत्पादन खर्च यांचा हिशोब ठेवणे करीता अकाउंटिंगचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. याकरिता बचत गटांना या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना बोलावून प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करा. याशिवाय बचतगटांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिखर बँकेचे अधिकारी डीमार्ट, बिग बाजार, सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक व बचतगटांचे महिला अध्यक्ष व प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याच्या सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या. यावेळी विविध बचतगटांच्या महिलांशी त्यांना येणाऱ्या अडचणींवर सीईओ स्वामी यांनी चर्चा केली. बचतगटांनी तयार केलेली विविध उत्पादने यावेळी महिलांनी सीईओ स्वामी यांना दाखविले. 

यावेळी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी,राज्य अभियान व्यवस्थापक नितीन हरचेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडवळी, दयानंद सरवळे, अमोल गलांडे सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक इ उपस्थित होते.

आषाढी वारी मध्ये उमेद अभियान मार्फत वारी मार्गावर व पंढरपूर येथील कृषी महोत्सव मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे 78 स्टॉल लावण्यात आले होते.. त्यामधून एकूण उलाढाल 10 लाख रुपये झाली असून त्यामधून एकूण 3 लाख रू नफा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments