Type Here to Get Search Results !

नाटेकर, कुंभार यांच्यासह चार उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी, माढ्याच्या प्रांत प्रियंका आंबेकर यांची फलटण ला बदली.



सोलापूर (प्रतिनिधी ) अप्पर जिल्हाधिकारी पदासाठी पात्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सोमवारी निवडश्रेणी जाहीर केली. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची फलटणच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली.

महसूलचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गणेश निहऱ्हाळे यांचा समावेश आहे. या सर्वांना पुढील काळात अप्पर जिल्हाधिकारीपदासाठी संधी मिळेल. दरम्यान निवडश्रेणी देताना आहे त्या पदावरच त्यांना सेवा करावी लागणार आहे. माढा विभागाच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची फलटणच्या प्रांताधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर अजुन कोणाचीच नियुक्ती झालेली नाही.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.