Type Here to Get Search Results !

परिमंडळ कार्यालय अ विभाग वादाच्या भोवऱ्यात धान्य वाटपात सावळा गोंधळ साड्यांची परस्पर विल्हेवाट अंत्योदय योजनेचा बोजवारा अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कारवाई कडे शहरवासियांचे लक्ष.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) मागील काही महिन्यापासून सोलापूर शहरात नवनिर्वाचित कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ओंकार पडोळे हे रुजू झाल्यापासून रेशन दुकानदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ई के वाय सी असो किंवा अन्न सप्ताह दिन अश्या शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना चांगलेच यश प्राप्त झाल्याने सोलापूर शहर धान्य वाटपात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.तर दुसरीकडे सोलापूर शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्यावर भरारी पथक नेमून दोन वेळा कारवाई केल्याने अवैधरित्या गॅस पॉईंट चालवणऱ्यानी देखील

  चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे इतक्या पारदर्शकता वातावरणात परिमंडळ अ विभागातील दुकानदारांनी मात्र धान्य वाटपात सावळा गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे, मुख्यमंत्री योजनेअंतर्गत साडी वाटप न करता परस्पर विल्हेवाट

लावणे काही दुकानदार अंत्योदय लाभार्थीना पूर्ण धान्य देत नसल्याचे.



दिसून येत आहे या बाबत शिस्तप्रिय कर्तव्य दक्ष असणारे उपजिल्हाधिकारी तथा अन्नधान्य वितरण अधिकारीओंकार पडोळे यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य पीडित लाभार्थी कडून होत आहे.यापूर्वी देखील नागरिकांच्या तक्रारी वरून मागील अन्न धान्य वितरण अधिकारी हे भरारी पथक नेमून दोषी दुकानदारावर कारवाई केल्याने

दुकानदारावर चांगलाच आळा बसला होता . आता आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने नावाजलेले अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी भरारी पथक नेमून घडत असलेल्या प्रकाराची शहानिशा करून सर्वसामान्य लाभार्थीना न्याय मिळवून देतील का ? या कडे संपूर्ण घटनेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.