कोणतेही धागेदोरे नसताना परराज्यातून तिघे चोरटे गजाआड जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.

 



सोलापूर (प्रतिनिधी) 27 तोळे सोन्याचे दागिने व 02 किलो चांदी वस्तू चोरीच्या गुन्ह्यात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील डी.बी. पथकानं कोणतेही धागेदोरे हाती नसताना कौशल्य पणाला लावत परराज्यातून तिघा आरोपींना गजाआड केलंय. त्या आरोपींच्या ताब्यातून 36.22 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलं आहे. या आरोपींच्या अटकेमुळं अन्य गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता वर्तवली जातेय.


शेळगी परिसरातील थोबडे नगरातील रहिवासी शिवानंद लिंगप्पा कडबगावकर यांच्या घरी 13 जून रोजी दुपार पूर्वी घडलेल्या धाडसी चोरीच्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने 27 तोळे सोन्याचे दागिने व 02 किलो चांदीचे वस्तू चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे.


शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भय निर्माण करणारा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम राज कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांनी जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी आणि पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकास आदेशित केले होते.


या गुन्ह्यातील आरोपींची कोणतीही माहिती नसताना पोलीसांनी त्यांच्या तपासाचं कौशल्य वापरुन तिघा आरोपींना राजस्थानातून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 36.22 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. 


प्रधान राधाकिसन बागरिया (वय-३१ वर्षे, रा-बावन माता इलाका सावर जिल्हा अजमेर), रमेश रामनिवास बागरिया (वय-२७ वर्षे, रा-सखलिया ता-फुलियाकला जि-भिलवाडा) आणि शंकर अमरलाल बागरिया (वय-२० वर्षे, रा-मोटाला, ता-सावर जि-अजमेर) अशी आरोपींची नांवं आहेत. 

आरोपीतांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती काढून डी.बी. पथकानं या त्रिकुटाला राजस्थान इथं जावून त्यांचा शोध घेऊन या गुन्ह्यात अटक केली. त्यांच्या ताब्यातून कडबगावकर यांच्या घरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील घबाडापैकी 36.22 ग्रॅम सोने जप्त झाल्यानं गुन्हा उघडकीस आला त्यांच्याकडून अन्य गुन्ह्यांचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तपासानं कौशल्यानं परराज्यातूनही आरोपी जेरबंद आणू शकतो, हे दाखवून दिलं आहे.


ही कामगिरी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक, पो.हे.कॉ./१६८५ खाजप्पा आरेनवरु, पो.हे.कॉ./१३७० शितल शिवशरण, पो.कॉ./१५०४ दत्तात्रय काटे, पो.कॉ./१७३६ दत्ता मोरे, पो.कॉ./१०३७ किरण जाधव, पो.हे.कॉ./१३२१ बसवराज स्वामी, पो.हे.कॉ./३३३ शिवानंद लोहार, पो.कॉ./१५६५ दादासाहेब सरवदे, पो.कॉ./९८ अभिजीत पवार, पो.कॉ./१६५७ निलेश घोगरे, पो.कॉ./६१३ स्वप्नील कसगावडे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments