विसर्जन मिरवणुकीतील डीजे टेम्पोसह जप्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यात पहिलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांची फताटेवाडीत कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्हाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढले. पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्या. तरीपण, एनटीपीसी फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर ) येथील गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत 'डीजे' लावला होता. वळसंग पोलिसांनी त्या 'डीजे'वाल्या बाबूला पकडले डीजे सिस्टीम व टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे.




जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (१) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे, लेझर लाईट वापरास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजेविरोधात सक्त सूचना केल्या आहेत. तरीदेखील, फताटेवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक तेथे पोचले या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने विनायक गुरु शांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मिरवणुकीतील डीजे टेम्पो इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणले डीजे वाल्यास नोटीस देऊन सोडले असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments