सोलापूर (प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक होऊन भाजपची चिंतन बैठक पार पडली, मात्र बैठकीनंतर भाजपच्या चिंतेत आणखीन एक भर पडली ती भवानी पेठच्या अण्णांच्या भावी आमदारची त्यांच्या समर्थकांनी टाकलेल्या पोस्टने. सुरेश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. सोलापूरच्या राजकारणात चर्चेत व नावाजलेले असं दबंग व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश पाटलांची ओळख. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, जिल्हा नियोजन सदस्य असे अनेक पद भूषविलेल्या अण्णांचा शहर उत्तर मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या सोशल मीडियावर पडत असलेल्या भावी आमदारच्या पोस्टने विद्यमान आमदार विजय देशमुख मालकांना टेन्शन देणारी असून, मराठा आरक्षण, सविंधान व मुस्लिम मतदारांची नाराजीमुळे शहर उत्तर मतदारसंघात 70 हजारांचा लीड अवघ्या 35 हजारावर आलेला असताना,भाजपमधील सुरेश पाटील यांच्या सारखे नेते विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी न दिल्यास दुसरा विचार केल्यास, भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. धर्मराज काडादी महेश कोठे व पक्षातील अंतर्गत कलह या सगळ्या बाबीचा विचार करता येणारी शहर उत्तर ची विधानसभा निवडणुकीत भाजपा बालेकिल्ला असणारा शहर उत्तर मतदारसंघ देखील खेचून आणण्यास भाजपा ला तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की. एकंदरीत सुरेश पाटलांमुळे शहर उत्तर विधानसभेचे समीकरणे बदलणार का? लवकरच समजेल.
0 Comments