यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुका पहिल्यांदाच डीजेमुक्त पार पडल्या. सर्वच गणेशभक्तांनी मिरवणुकांचा आनंद घेतला. त्याबद्दल पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण डीजेमुक्त मिरवणूका सोलापूर शहरात तरी शक्य नव्हत्या आजपर्यंत च्या सर्वच मिरवणुका डीजे अन लेझरशोच्या माध्यमातून झाल्या. सोलापूर शहरात डीजे मुक्त मिरवणूका काढण्यासाठी सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अतिशय कडक पणे अन निर्भीड पणे घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय असून आज पर्यंतच्या सोलापूर शहरातील कोणत्याही पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त मिरवणुकीसाठी असा प्रयत्न केलेला दिसत नाही ही कणखर भूमिका आणि धाडस फक्त सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनीच करून दाखवलं आहे आज सोलापूर शहरातील जनता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे कोणत्याही राजकीय सामाजिक दबावाला बळी न पडता सोलापूर शहरात डीजे मुक्त मिरवणुका काढण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय दमदार असून पोलीस आयुक्त काय चीज आहे ? हे एम राजकुमार यांनी राज्यकर्त्यांना दाखवून दिले आहे
सोलापूर शहरातील डीजेमुक्त मिरवणुका बाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या धाडसी निर्णयाचं सोलापूरकरांनी भरभरून स्वागत केलं असून केवळ डीजे मुक्ती निर्णय तर अंमलबजावणी देखील केली आहे त्याच बरोबर
लेझर लाइटशो च्या देखील वापरावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी निर्बंध घातले आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील सोलापूरकरांना पाहायला मिळाली त्यामुळे अनेकांना गणेशोत्सवात कुटुंबासह मिरवणुकांचा आनंद घेता आला तसेच आनंद घेणाऱ्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात दिसून आले. 'डीजे' च्या कर्णकर्कश आवाजामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मिरवणुका पाहायला येता येत नाही. याशिवाय शाळा, दवाखाने, रहिवासी व औद्योगिक क्षेत्रातील लोकांना त्या आवाजाचा मोठा त्रास होतो. पण, यंदा पोलिस आयुक्तांच्या आदेशामुळे 'डीजे' मुक्त गणेश विसर्जन भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडल्याचे सोलापूरकर अभिमानाने सांगत आहेत सोलापूर शहरात मिरवणुकीत डीजे मुक्ती आणि लेजरशो बंद करणारा अवलिया पुन्हा होणार नाही सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतलेला दमदार निर्णय सोलापूरकर कधीच विसरू शकणार नाही. अश्या धडाकेबाज धाडसी अन कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मानाचा मुजरा !!
*यशवंत पवार*
संपादक
कार्यसम्राट न्यूज सोलापूर. 🙏
