सोलापूर (प्रतिनिधी)
पूरग्रस्तांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाश्ता व जेवण देण्याचा उपक्रम येथील पोलिस हवालदार अनिल गवसने यांनी सुरू केला आहे. फोन केल्यास २० मिनिटांत हॉस्पिटलमध्ये जेवण व नाष्टा मोफत पोहोच केला जात आहे. हा उपक्रम आठवडाभरापासून सुरू असून आतारपर्यंत १८०० जणांना नाष्टा व जेवण दिले आहे.
पोलिस हवालदार गवसने हे पोलिस सेवेबरोबर सामाजिक कार्य
ही करत असतात. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची अवस्था त्यांनी स्वतः अनुभवले आहे. एक हॉस्पिटलचे बील भरण्याचा तणाव, त्यात गावाकडे पूरस्थिती असल्यामुळे नातेवाईकांना जेवण मिळत नाही, मेस अथवा हॉटेलमधून विकत घेणे जिकरीचे होते. अशा लोकांना मदत व्हावी, मायेचा घास मिळावा यासाठी हॉस्पिटलमध्ये डबा व नाश्ता पोहोच देण्यास सुरुवात केली आहे, असे हवालदार गवसने यांनी सांगितले. त्याना या कार्यात
आई, पत्नी, वहिनींसह पाच महिला, मित्रांची खंबीर साथ मिळतं आहे
पूर ओसरेपर्यंत लोकांना नाष्टा व जेवण पुरवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांची आई, पत्नी, वहिनी व आईच्या मैत्रिणी असा पाच महिलांकडून डबा तयार करून घेतला जात असून डब्यामध्ये तीन चपाती, सुकी भाजी, डाळ व भात, शेंगा चटणी, लोणचे असे पदार्थ दिले जातात. ९५२७२ ०५०० वर फोन केल्यास २० मिनिटांत डबा पोलेच मिळेल अशी सोय केली आहे. यासाठी गवसने मित्रांची मदत घेत आहेत.
