सोलापूर (प्रतिनिधी )
यातील फिर्यादी नंदा रमेश शिंदे, वय ६८ वर्ष, रा.जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर (ज्येष्ठ नागरीक) यांनी दिलेल्या तक्रारी वरून त्यांची दोन मुले व दोन सुना यांनी सन २०१५ पासून फिर्यादी व त्यांच्या पतीचा सांभाळ न करता त्यांच्या राहण्याची, जेवणाची व आरोग्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच त्यांना वारंवार शिवीगाळ करून घराबाहेर काढले व त्यांच्या नावावरील घराचा स्वतः उपभोग घेतला, तसेच दि.१०/०७/२०२६ रोजी फिर्यादी स्वतःच्या घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा
घराबाहेर हाकलून दिल्याचेही सदर ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्याने, सदर तक्रारीचे गांभीर्य पुर्वक दखल घेऊन, फिर्यादी यांचे मुले ०१) अतुल रमेश शिंदे,
०२) अनुप रमेश शिंदे, सुना (3) सुवर्णा अतुल शिंदे
०४) दिपाली अनुप शिंदे यांचेवर, फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे ज्येष्ठ नागरीक, पालन पोषन व त्यांची देखभाल अधिनियम २००७ चे कलम २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई वरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे सजगता व तत्परता दिसून आली
फौजदार चावडी पोलीस ठाणे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्येष्ठ नागरिकांचा छळ करणे, त्यांना घराबाहेर काढणे, त्यांचे पालनपोषण न करणे किंवा त्यांना मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोह/रूपनुर, पोकॉ/कुंभार, पोकों/बोराडे यांनी केली आहे.
