Type Here to Get Search Results !

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कामगिरी 14 मोटारसायकलसह तब्बल 06 लाख 55.000/ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत




सोलापूर (प्रतिनिधी ) चार वर्षात सोलापूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यांतून ४० दुचाकी चोरणाऱ्या पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येशील चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखने सीताफिने जेरबंद केले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार येथून त्याने एक दुचाकी (एमएच १३, डीके ५५११) चोरली होती. त्या गुन्हाच्या तपासात तो सापडला आणि गेल्या सहा महिन्यांत त्याने १३ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. सत्यवान रामहरी भोसले (वय 32)

 असे त्या चोरट्याचे नाव आहे. सोलापूर शहरात सतत होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी शहर गुन्हे शाखेचे पथक मैदानात उतरले. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी 

चोरीला गेल्या होत्या, त्या घटनांचा तांत्रिक अभ्यास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. त्यावेळी एक तरुण हेल्मेट हातात घेऊन पायी येत असल्याचे आणि चोरीनंतर दुचाकीवरून निघून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला 

हैदराबाद रोडवरील बाजार समितीजवळ तो दुचाकीसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. खेडकर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तो एसटी बसने हेल्मेट हातात घेऊन यायचा. सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणांवरील दुचाकी चोरून हेल्मेट घालून पसार व्हायचा, अशी बाब तपासात समोर आली.






ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील हवालदार विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.