Type Here to Get Search Results !

पुणे पॅटर्न ची सोलापूरात जोरदार चर्चा 'शहर के कमिशनर हम ही है', म्हणत रील काढणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड. उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक

 



सोलापूर (प्रतिनिधी ) नई जिंदगी परिसरातील


मौलाना चौक येथे एका तरुणावर कोयत्याने आणि लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी भररस्त्यावरून नेले. सैफ मुकदूम शेख (रा. नई जिंदगी) असे कारवाई झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने एक व्हिडीओ काढत 'शहर के कमिशनर हम ही लोग है' असा आशय असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी केला होता.


गुरुवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील मौलाना चौक येथे जुन्या वादातून दोन गटांत भांडण झाले होते. या भांडणाचे रूपांतर

भीषण हाणामारीत झाले. आरोपी सैफ शेख आणि जैद शामू शेख (रा. नई जिंदगी) यांनी फिर्यादी मुस्तफा जाकीर शेख (रा. मौलाना आझाद चौक, नई जिंदगी) यांच्यावर लोखंडी पाइपने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात फिर्यादी मुस्तफा जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना नई जिंदगी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा वचक निर्माण झाला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


          *गाडीऐवजी नेले पायी*


आरोपीची कोणतीही मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी, परिसरात लोकांना धमकावणे, वाद घालणे आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आरोपीला गाडीत न नेता, परिसरातून पायी चालवत पोलिस ठाण्यापर्यंत आणले, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या

भूमिकेमुळे परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.


        *असा होता व्हिडीओ*


आरोपी सैफने नई जिंदगी परिसरात फिरत एका हाताने गाडी चालवत एक व्हिडीओ तयार केला. यात "पोलिस चौकी के हिसाब से शहर बाट रहे हो

सुल्तान, चौकीयाँ चाहे पुलिस की हो शहर के कमिशनर तो हमी ही लोग है असा चित्रपटातील डायलॉग ऐकायला मिळाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर कारवाईनंतर आरोपी सैफ माफी मागतानाचा ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.