Type Here to Get Search Results !

मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुक पारंपारिक वाद्यांसह सकाळी ११.३० होणार प्रारंभ - आ.विजयकुमार देशमुख ट्रस्टी अध्यक्ष

 



सोलापुर (प्रतिनिधी ) सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुक पारंपारिक वाद्यांसह सकाळी साडेअकरा वाजता निघुन लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रध्दानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणूकीस सुरुवात करावी असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केले.

या पत्रकार परिषदेस ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके,सचिव अनिल सावंत,खजिनदार चंद्रशेखर कळमणकर,गुरुनाथ निंबाळे,राहुल कुमने,किरण अक्कलकोटे,केदार वनारोटे,शिवानंद सावळगी,अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.