सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सूळसळाट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,सीईओच्या कारवाई कडे जिल्हावासियांचे लक्ष.




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर जिल्हा आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसताना देखील सोलापूर जिल्ह्यात करमाळा मोहोळ माळशिरस पंढरपूर उत्तर सोलापूर मंगळवेढा माढा सांगोला या सह अनेक भागात डिग्री नसलेले अनेक बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीकडून फारसे कारवाई चे पाऊल उचलले जात नाही ग्रामीण भागातील गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णादेखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक डॉक्टर ची चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर सोलापूर जिल्ह्यात उघडपणे व्यवसाय करत आहेत सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर व 

आरोग्य विभाग जिल्हा परिषद वतीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

*बोगस डॉक्टर विरोधात अनेक तक्रारी मात्र कारवाई शून्य*

सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त असून देखील जिल्हा आरोग्य अधिकारी बोगस डॉक्टरवर कारवाई करत नसल्याचे विदारक चित्र दिसत असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत असून सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही 

*मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कारवाई कडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष*

सोलापूर जिल्हा परिषद च्या मुख्यकार्यकारी ह्या अतिशय कडक शिस्तीच्या असून प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कायम पाठीशी राहात असून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई चा बडगा उचलतात अशी त्यांची कामाची पद्धत असून  जिल्हा परिषद मधील अनेक कामचुकार अधिकाऱ्यांनां त्यांनी चांगलेच वठनीवर आणून जिल्हा परिषद मधील कारभार सुधारला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर रोखण्यात अपयशी ठरलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सी ई ओ काय कारवाई करणार? याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments