शिवआरोग्य फलक लावण्याबाबत अधिष्ठता यांना शिवआरोग्य सेनेचे निवेदन



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालय मध्ये उपचार घेण्यासाठी रोज शेकडो लोक येत असतात उपचारासाठी येणाऱ्या लोकांना आरोग्य विषयी असलेल्या शासकीय योजना ची माहिती नसते त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो उपचारासाठी येणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी व उपचार सुलभ होण्यासाठी शिवआरोग्य सेना वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालय येथे रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी फलक लावण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून शिवआरोग्य सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालय चे अधिष्ठता डॉ संजीव ठाकूर यांना निवेदन देण्यात आले

यावेळी शिवआरोग्य सेनेचे शहर उत्तर समन्वयक सुमित भांडेकर जिल्हा संघटक डॉ शकील आत्तार कुणाल धोत्रे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments