शेळगीत आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन

 


सोलापूर - राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या दोन मजली बांधकामाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. शेळगीत आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार आमदार देशमुख यांनी मंजूर केलेल्या ७५ लाखांच्या विशेष निधीतून या इमारतीचे बांधकाम होणार आहे.


आमदार देशमुख म्हणाले, शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता ही इमारत बांधण्यात येत आहे. तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलिस चौकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.



याप्रसंगी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासआरोग्य अधिकारी राखी माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपायुक्त अजित बोऱ्हाडे पोलीस निरीक्षण सुहास चव्हाण भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष विजया वडेपल्ली डॉ अतिश बोऱ्हाडे सिद्धेश्वर बोरगे म न पा अवेक्षक महेश केसकर अभिजीत बिराजदार इत्यादी उपस्थित होते 


          पोलिस चौकीचीही सोय


पोलिस चौकीसाठी शेळगीतील कांचन सोसायटीत सहा हजार चौरस फुटांची जागा आरक्षित आहे. पोलिस चौकीच्या इमारतीसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार निधी दिल्याने या इमारतीत पोलिस चौकीचीही सोय होणार आहे.

Post a Comment

0 Comments