सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील दामलेवस्ती मुळेगाव रोड येथील प्रज्ञासुर्य भिमराज बहुउध्देशिय सामाजिक संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले असुन, सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करत आहेत. तरी सोमवार दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नुतन पदाधिकाऱ्यांची निवड संस्थेचे संस्थापक आकाश भाऊ मस्के यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख अक्षय मस्के व मनोज गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली असुन, या निवडीपुर्वी विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व सामुहिक बुद्धवंदना घेऊन सुरुवात करण्यात आले.
अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक : आनंद दादा चंदनशिवे, शिवराज जाधव उपसरपंच मुळेगाव
अध्यक्ष : अमर खरात
उपाध्यक्ष : अभिषेक सरवदे, स्वरुप बनसोडे, अनिकेत खरात, निलेश चव्हाण, प्रेमनाथ गायकवाड, हसन शेख
खजिनदार : अजमेर शेख
कार्याध्यक्ष : प्रकाश बनसोडे
सचिव : खंडू गायकवाड, आकाश कांबळे
मिरवणुक प्रमुख : सहदेव मस्के, महादेव कांबळे, अपसर शेख, अभिषेक पालिया, संजय गायकवाड, बुद्धभुषण खरात
सल्लागार : अजय बनसोडे, वीर बनसोडे, मनोज मस्के, राकेश गायकवाड, अभिजित कांबळे, सम्राट बनसोडे, प्रतिक बनसोडे, सनद बनसोडे आदिंची निवड करण्यात आली असुन आलेल्या कार्यकर्त्यांचा पंचशील शेला घालुन तर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार व पंचशील शेला घालुन सत्कार करण्यात आला व शेवटी उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मंडळाचे नुतन अध्यक्ष अमर खरात यांनी मानले.
0 Comments