Type Here to Get Search Results !

शासकीय धान्य गाडीत भरताना तिघे जेरबंद तांदळाची २३० पोती जप्त; संशयितांना पोलिस कोठडी




सोलापूर (प्रतिनिधी ) अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी ज्या वाहनाला धान्य वाहतुकीचा परवाना दिला त्यात धान्य भरून आणले आणि वाटेत खासगी वाहनात भरताना सदर बझार पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्या तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली असून तांदळाची २३० पोती काळ्या बाजारात नेली जात होती असा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.


शासनाकडून दरमहा गोरगरीब लाभार्थीना स्वस्तात धान्य दिले जाते.


शासकीय गोदामात साठवलेले धान्य परवानाधारक वाहनातून रेशनधान्य दुकानांना पुरवठा केले जाते. पण, रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून चार लाख ६० हजार रुपयांचे धान्य भरून घेतले. त्यावेळी तेथील मुनिम राहुल तुळशीराम गंगावणे याच्या सांगण्यावरून वाहनचालक अल्लाउद्दीन गुलाबसाब शेख याच्याकडे शासकीय धान्य वाहतुकीचा परवाना नसताना देखील त्याने त्याच्या टेम्पोत (एमएच १३, एएक्स २३८९) ते धान्य भरले. तत्पूर्वी, ते धान्य गंगाधर नवलिंग खोबरे याच्या परवानाधारक वाहनात भरले होते. शासकीय धान्य खासगी टेम्पोत भरून ते काळ्या बाजारात नेले जात


असल्याची खबर सदर बझार पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेत त्या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या टेम्पोचालकाकडे परमीट मागणी केली, पण त्याच्याकडे नव्हते. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार शहरातील काही रेशनधान्य दुकानांमध्ये मोठे वाहन जात नसल्याने लहान टेम्पोत ते धान्य भरले जात होते. मात्र, त्या टेम्पो चालकाकडे त्या धान्य वाहतुकीचे परमीट नव्हते. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्या तिन्ही संशयीतांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.