Type Here to Get Search Results !

भिमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी




सोलापूर(प्रतिनिधी ) छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त भिमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 26/06/2025 रोजी वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे व्यसनमुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करत व्यसन मुक्त फलक व बॅनर तयार करुन विद्यार्थ्यांना व नागरीकांना यांचे महत्व सांगण्यात आले.छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस दिव्यांग व्यक्तींकडून पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली 

 सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीचे कार्याध्यक्षा चित्रा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्षा किरण माशाळकर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष अहमद शेख, सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम, हणमंतु माने, भिमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजूदा नागमोडे, अध्यक्ष रोहन सिताफळे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल दिलपाक, राजु कांबळे, नागेश कांबळे, आरती हब्बु, आशा वाघमारे, उज्वला मुदगल, विजया कांबळे, आशाताई वाघमारे, दिव्यांग वासु होनकोंबडे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.