Type Here to Get Search Results !

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण...




 सोलापूर (प्रतिनिधी) 


महाराष्ट्रातील सिमेंट व बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीत नावारूपास आलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी ( कॉन्फरेन्स) आज २७ जुन रोजी वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रस्थान केले, 


गोवा सोलापूर विमानसेवा चालू झाल्यानंतर वितरकांची परिषद गोवा येथे घ्याचे ठरले होते, त्यानुसार विमान कंपनीला १३५ आसनांची मागणी केली होती परंतु विमानाची आसनक्षमता कमी असल्या कारणाने काही वितरक सोलापूर विमानतळावरून , काही वितरक हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर काही वितरक जळगाव विमानतळावरून आज रोजी गोव्यासाठी कंपनीचे महाराष्ट्र हेड श्री महादेव कोगनूरे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान केले.  



आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणार्‍या वितरकांसाठी मागील वर्षी कंपनीने दुबई दौरा तसेच तीन महिन्याखालीच कझाकिस्तान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने सुरु सोलापूर विमानतळावरून इतक्या मोठया संख्येने वितरकांना घेऊन जाणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली असून हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. 


गोवा दौऱ्यात वितरकांच्या परिषदेसोबत इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन कंपनीने केले असून, दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड श्री राजेश सिंग यांचे श्री महादेव कोगनूरे यांनी मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.