Type Here to Get Search Results !

संवेदनशील भागात पोलिस निरीक्षकांची पायी गस्त पोलीस उपायुक्तांचे आदेश, रात्री विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील कादरी मशीद, घोंगडे वस्ती या परिसरात २८ दिवसांत दोन दगड फेकीच्या घटना घडल्या. शहरात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी पोलिस एम. राज कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या ठाण्यांच्या प्रभारींना स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी - त्यांच्या परिसरातील


संवेदनशील भागात पायी गस्त घालणार असून तसे आदेश काढण्यात आले आहेत.


सोलापूर शहरात एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पेठ, सदर बझार, विजापूर नाका, सलगर वस्ती, फौजदार चावडी अशी सात पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही संवेदनशील ठिकाणे असून, त्याठिकाणी काही वेळा दगडफेकीसारख्या घटना घडतात. दोन गटात, जाती-धर्मात त्यातून तणाव निर्माण होतो आणि सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोचते.


जूनअखेर सोलापूर शहरातील बाबा कादरी मशिदीच्या परिसरात आणि आता जुलैमध्ये म्हणजेच २८ दिवसांत दोन गटात दगडफेकीच्या दोन घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तशा भागात नगरांमध्ये पायी गस्त घालावी लागणार आहे. दररोज रात्री दोन तास त्यांना गस्त घालण्याचे आदेश असून, त्याचा अहवाल क्राईम मिटिंगवेळी पोलिस आयुक्तांना द्यावा लागणार आहे. रात्री ११ नंतर नियमित पेट्रोलिंग पथके शहरात गस्त घालणार आहेत.


शहरातील सात पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आता दररोज रात्री त्यांच्या परिसरातील संवेदनशील भागात पायी गस्त घालतील. त्यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस अंमलदार देखील असणार आहेत.

..................................................................

रात्री 8 ते 10 या वेळेत अधिकाऱ्यांची असणार गस्त 

दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्याचे प्रभारी त्यांच्या महत्वाच्या ठिकाणी ज्या भागात सर्वाधिक गुन्ह्याचे प्रमाण आहे अशी ठिकाणी निश्चित करून तेथे पारी पेट्रोलिंग करणार आहेत त्यावेळी कोणी विनाकारण गटागटाने रस्त्यावर थांबलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे भविष्यात दोन गटात जाती -धर्मात वाद होऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे 

            विजय कबाडे 

      पोलीस उपायुक्त सोलापूर शहर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.