सोलापूर (प्रतिनिधी ) नुकतेच सोलापूर शहरातील नावाजलेले वास्तुविशारद व कमला सह. बँकेचे माजी चेअरमन यादगीरी कोंडा यांचे ज्येष्ठ सुपुत्र वास्तु विशारद दिपक यादगीरी कोंडा हे अभ्यास दौऱ्यासाठी चीन साठी प्रयाण केले.
त्यांच्या या अभ्यास दौऱ्यात त्यांच्या सोबत सोलापूरातील नावाजलेले ज्येष्ठ व्यवसायीक दत्ता (आण्णा) सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी त्यांचा अभ्यास दौरा यशस्वी व्हावा त्यांची यशस्वी व्यवसायीक वाटचाल व्हावी या हेतूने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.
हा सत्कार सोहळा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास मंच च्या पद्मशाली चौक येथे कार्यालयात पार पडला. ज्येष्ठ कामागर नेते व मी सोलापूर माझे सोलापूर चे संस्थापक विष्णु कारमपुरी महाराज व पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या शुभहस्ते दीपक कोंडा यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दै. अबतक चे संपादक प्रसाद जगताप, दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद, जिल्हा प्रमुख दिपक शिंदे, विठ्ठल कुऱ्हाडकर, अरविंद भिमनाथ, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रेखाताई अडकी, शरणप्पा जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments