Type Here to Get Search Results !

जाहिरात नाही तर बातमी पण नाही - यशवंत पवार. इथून पुढे फुकट कोणालाही प्रसिद्धी देऊ नये




सोलापूर(प्रतिनिधी) सोलापूर शहर  जिल्ह्यातील काही राजकीय सामाजिक मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात परंतु वर्धापन दिन किंवा दीपावली ची जाहिरात मागितली तर विविध कारणे सांगतात जाहिरात बाबत सौजन्य दाखवत नाहीत वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात द्यायची नाही अशा पुढार्‍यांच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बातम्या छापल्या जाऊ नयेत असे आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केलं आहे कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे त्याच बरोबर लॉकडाऊन काळात प्रचंड प्रमाणात वृत्तपत्र क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून वृत्तपत्र निर्मिती वितरण जाहिराती वसुली मोठ्या प्रमाणात थांबली असून वृत्तपत्र व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या वृत्तपत्र व्यवसायावर प्रचंड प्रमाणात मंदी आली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीचे व कठीण झाले आहे. त्यामुळे वृत्तपात्राचे संपादक वार्ताहर प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले असून या गोष्टीचा राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा परंतु तसेच दिसत नाही सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध संस्था चालकांनी जाहिरात दिल्यानंतर पत्रकारांना दोन पैसे मिळतात त्यातून त्यांचे कुटुंब चालते उदरनिर्वाह चालतो जाहिरात नाही दिले तर पत्रकाराने संसाराचा गाडा हाकाचा तरी कसा?असा असं जळजळीत सवाल प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी विचारला असून अशा संधी साधू राजकारणा च्या धोरणाला कुठेतरी आळा व चाफ बसायला पाहिजे यासाठी ज्या राजकारण्यांनी संस्था चालकांनी वृत्तपत्रा च्या वर्धापन दिन किंवा दीपावली अंकात जाहिराती देत नाहीत अशा राजकीय पुढाऱ्यांच्या व संस्था चालकांच्या वर्षभर बातम्या छापू नयेत ज्या पत्रकारांना राजकीय जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर बातम्या लावण्याचे किंवा छापण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी आवर्जून सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.