Type Here to Get Search Results !

महिला वकिलाच्या घरी चोरी; चोरटा २४ तासांतच जेरबंद सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांची धमाकेदार कामगिरी.

 



सोलापूर( प्रतिनिधी ) उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाजवळील पत्रकार नगरातील महिला वकील पद्मजा रणजित बनहट्टी यांच्या भाड्याच्या घरातून सहा लाख ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या चोरीची उकल केली आहे. शुभम सीताराम कजाकवले


(वय १९, रा. लष्कर, उत्तर सदर बझार) असे त्या संशयिताचे नाव आहे.


दारू पिण्यासाठी हजार-पाचशे रुपये मिळतील म्हणून शुभम हा २८ जून रोजी पत्रकार नगरातील यशोधन ब्लिडिंगमध्ये खिडीकीतून आत शिरला. पण, कपाटात शोधताना त्याच्या हाती सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले असा ऐवज लागला. सर्व ऐवज घेऊन तो तेथून पसार झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी


केली आणि एका अंमलदाराने त्या संशयितास ओळखले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्याला दारूचे व्यसन असून काही महिन्यांपूर्वी त्याला वीजेचा शॉक लागल्याने त्याच्या शरीराचा एक जळालेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्यसनातूनच त्याने चोरी


केली असून यापूर्वी त्याच्याविरूद्ध कोणताही चोरी, घरफोडीचा गुन्हा नव्हता, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार यांच्यासह सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.