Type Here to Get Search Results !

चार परिमंडळा मध्ये 6073 अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी,अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांची माहिती.



सोलापूर (प्रतिनिधी ) अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्यात आली आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशान्वये अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटूंब एक साडी मोफत वितरण करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत चार परिमंडळाच्या अधिनस्त असलेल्या रास्त भाव दुकानातून 6073 साड्या वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे यांनी दिली.

या योजनेंतर्गत साड्यांचे वितरण प्रजासत्ताक दिन (दिनांक 26 जानेवारी 2025) ते होळी (दि. 13 मार्च 2025) या सणांच्या दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्त भाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाव्दारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळविण्यात आलेले आहे.

पुरवठा करावयाच्या साडीच्या एका गाठीचे वजन हे (100 साड्या) 41 ते 46 किलो इतके राहील. या साड्याचे वाटप ई-पॉस मशीनव्दारे करण्यात येणार यावे. महामंडळाकडून तालुका गोदामापर्यंत ज्याप्रमाणे साड्यांचा पुरवठा करण्यात येईल, त्याप्रमाणात तात्काळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपर्यंत साड्यांचे वाटप करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. अशा शासनस्तरावरुन सूचना देण्यात आलेल्या आहेत.


तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना दोन वेळेस साड्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. अशा शिधापत्रिकाधारक कुटूंबांना या योजनेतून सन 2024-25 करीता पुरविण्यात येणाच्या साड्यांमधून वितरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत याप्रमाणे परिमंडळ अधिकारी अ, ब, क व ड यांना एकूण 6073 वितरीत करण्यात येत आहे. 

सन 2023-24 मध्ये चार परिमंडळामध्ये 98 साड्या शिल्लक असून, सन 2024-2025 मध्ये 5975 साड्या मंजूर आहेत, असून अशा एकूण 6073 साड्या वितरीत करण्यात येणार आहेत. गोदाम पर्यवेक्षक यांनी साडयाचे परमिट निर्देशन पत्रानुसार संबंधीत रास्त भाव दुकानदार यांना त्वरीत साड्यांचे वितरण करण्यात यावे, असे आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिले आहेत




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.