पुणे पाठाेपाठ आता मुंबई मध्येही. बड्या बापांच्या पाेरांची नशा कधी उतरणार ?

 


मुंबई : आधी पुणे आणि आता मुंबई, फक्त ठिकाण बदललंय, 


बड्या बापांच्या दिवट्यांची बेदरकार वागणूक तीच.

 हातात लाखो रुपयांची बंडलं, आलिशान गाड्या… सुख पायाशी लोळण घेत असतानाच ही श्रीमंती या मुलांच्या डोक्यात जाते. 


त्या नशेत मग त्यांना सामान्यांच्या जीवाचं मोलही राहत नाही. 

पुण्यातली पोर्शे कारची घटना ताजी असतानाच मुंबईतही एका नशेबाज दिवट्याने  एक कुटुंब उद्ध्वस्त केलंय.


 *या बड्या धेंडांना कायद्याचा कायमचा ब्रेक कधी लागणार हाच खरा प्रश्न आहे*.


पुण्यातील पोर्शे कारनं दोघांचा चिरडून मारल्याचं प्रकरण असो की वरळीतील बी.एम.डब्ल्यू. कारने कविता नाखवा यांना चिरडल्याचं प्रकरण असो,

 दोन्हीकडे हे कृत्य करणाऱ्यांमध्ये अनेक साम्य आहेत. 


त्यापैकी एक म्हणजे हे दोघेही बड्या बापाचे दिवटे आहेत. 

या दोन्ही दिवट्यांनी बारमध्ये जाऊन दारूचे घोट घेत घसा ओला केला आणि त्याच नशेत झिंगत गाडीचं स्टेअरिंग हाती घेत निष्पापांचे बळी घेतले. 

      *बड्या बापाचं पोरं*, 

जीवघेणी थेरं

वरळीत मासे विकून पोट भरणाऱ्या कविता नाखवा यांचा जीव घेण्याआधी मिहीर शाहाने जुहूच्या बारमध्ये १८ हजारांची दारू ढोसली

दारू पिऊन गोरेगावला मैत्रिणीच्या घरी गेला. तिथून लाँग ड्राईव्हला जाण्याची हौस भागवण्यासाठी वरळीकडे निघाला. पुन्हा गोरेगावकडे जाताना वरळीत अॅट्रिया मॉलजवळ नाखवा दाम्पत्याला धडक दिली. 

मिहीर शाह अपघातावेळी दारूच्या नशेत असल्याची पोलीसांची माहिती आहे.  

वरळीत एका निष्पाप महिलेचा जीव घेणाऱ्या या हिट अॅण्ड रन प्रकरणाने मुंबईसह महाराष्ट्र हादरला. 

पण काही दिवसांआधी पुण्यात घडलेल्या पोर्शे कार अपघाताची आठवण अनेकांना झाली. 

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह सज्ञान असून त्याने अपघातापूर्वी मित्रांसोबत पार्टी केली. 

नंतर गाडी स्वतः चालवली आणि ६५ लाखांच्या बी.एम.डब्ल्यू.ने महिलेला उडवले. 

           *बाप बडा नेता*, 

*पोरगा पोलीसांच्या हाताबाहेर, अपघातानंतर मैत्रिणीच्या घरी आणि तिथून थेट फरार…

      अशी या पोराची कहाणी.

पुण्यातही बड्या बापाच्या पोराचा धिंगाणा 

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन होता. अपघातापूर्वी त्याने मित्रांसोबत पार्टी केली आणि नंतर गाडी स्वतः चालवली. अडीच कोटींच्या पोर्शे कारने दोघांना उडवले. 

बाप बडा उद्योजक, वाचवायला पैसा ओतला. 

*पुण्याचं पोर्शे कारचं प्रकरण असो की वरळीचं बी.एम.डब्लू. कारच्या अपघाताचं प्रकरण असो*, 

*अशा सगळ्या बड्या बापांच्या लाडोबांमुळे अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत हा खरा प्रश्न आहे*. 

म्हणूनच हिट अॅण्ड रन प्रकरणातील कायदे आणखी कडक करत दोषींना कायद्याच्या कचाट्यात घालून चांगलं सुजवण्याची गरज निर्माण झालीय. 

अन्यथा ही अशी बड्या बापांची धेंडं रस्त्यांवरील नागरिकांना अशीच चिरडत राहतील आणि अपघातानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करत हात चोळत राहू. 

काही दिवसांनंतर तेही विसरून जावू.

Post a Comment

0 Comments