Type Here to Get Search Results !

बोगस डॉक्टर कारवाई प्रकरणी अलवेज बिझीअसलेले नवीन विडी घरकुल पोलीस चौकी चे अधिकारी घेतायत मुहूर्ताचा शोध जेष्ठ पत्रकारांच्या तक्रारी ची केविलवाणी अवस्था



सोलापूर (प्रतिनिधी) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण द‌गावण्याची शक्यता नाकारता येत नाही.



त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवीन विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णादेखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी मा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी यांनी प्रयत्न करावेत तसेच वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी वळसंग पोलीस ठाणे यांच्याकडे दिनांक 17/ 6/2025 रोजी समक्ष जाऊन तक्रारी अर्ज दिला होता तब्बल पंधरा दिवस उलटून देखील नवीन विडी घरकुल च्या अलवेज बिझी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिलेल्या तक्रारी बाबत ना साधा फोन ना निरोप हाकेच्या अंतरावर असलेल्या वळसंग पोलीस ठाण्याकडून अद्याप अर्ज आला नसल्याचे अजब रित्या सांगितले जात असून जेष्ठ पत्रकारांच्या तक्रारी अर्जाबाबत इतकी दिरंगाई होतं असेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी चे काय? हा विचार मनाला वेदना देऊन जाणारा आहे नवीन विडी घरकुल पोलीस चौकीला दोन पोलीस अधिकारी असताना देखील जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांच्या बोगस डॉक्टर बाबत केलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताचा शोध घेत आहेत हे मात्र अद्याप समजून आले नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.