श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे फौजदार पोलीस ठाणे वतीने भव्य स्वागत हेल्थ किट चे वाटप.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) संत श्री. गजानन महाराज शेगाव पालखी सोहळ्यानिमित्त फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वतीने वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस ठाण्याच्या टीम ने उत्साहाने सहभाग घेतला.


पालखी मार्गावर फौजदार पोलीस ठाण्याजवळ पालखीचे आगमन होताच, अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करत, श्रीफळ अर्पण करून आणि “गजानन महाराज की जय” घोषात स्वागत केले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




आरोग्य विषयक जनजागृतीचा भाग म्हणून यात्रेकरूंना 'हेल्थ किट' वाटप करण्यात आले. यात मास्क, सॅनिटायझर, प्राथमिक औषधांचा समावेश होता. या सामाजिक उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले की,


 "अशा प्रकारच्या धार्मिक सोहळ्यांमध्ये पोलिसांची भूमिका केवळ कायदा-सुव्यवस्थेची राखण करणारी नसून समाजाशी जोडणारीदेखील असते."


फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा हा सेवाभावी उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.

Post a Comment

0 Comments