शहरातील परिमंडळ नवीन रास्तभाव दुकानाबाबत जाहिरनामा प्रसिध्द अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांची माहिती.




सोलापूर (प्रतिनिधी) शासनाचे धोरण दरवर्षी सध्याची रास्तभाव दुकाने/किरकोळ करोसीन परवाने तसेच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रदद होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात यावीत.

सदरील शासन धोरणानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सोलापूर शहरामधील सर्व परिमंडळ अधिकारी यांना लेखी पत्र देऊन जाहिरनामा प्रसिध्द करणे बाबतची विहीत नमुन्यातील माहिती मागविण्यात आली होती. सदर प्राप्त माहितीच्या आधारे अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांची नवीन जाहिरनामा प्रसिध्दीकरणास परवानगी घेऊन दि. 30 जुन 2025 रोजी खालील ठिकाणी नवीन दुकान मंजूरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर जाहिरनामा पाहणेसाठी सर्व परिमंडल अधिकारी सोलापूर शहर व अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

तरी सर्व इच्छूक महानगर पालिका (महानगरपालिका व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यात संबंधित परिमंडळ अधिकारी सोलापूर शहर यांचे कार्यालय येथे दिनांक : 01 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वतः सादर करावेत. सदरील अर्ज परिमंडळ अधिकारी कार्यालय सोलापूर शहर येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्याचे शुल्क घेऊन अर्ज संबधितास उपलब्ध होतील रास्त भाव धान्य शिधा वाटप जाहिरनामा सन 2025

परिमंडळ कार्यालय- परिमंडळ अ विभाग सोलापूर शहर –दुकाने शुक्रवार पेठ व बुधवारपेठ- एकूण संख्या 2

परिमंडळ ब विभाग सोलापूर शहर दुकाने –गुरूवार पेठ व पूर्व मंगळवार पेठ एकुण संख्या-2

 एकुण दुकाने - 04 अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments