डॉ. ऋत्विक जयकर यांच्याकडे अधिष्ठाताचा अतिरिक्त पदभार.




सोलापूर (प्रतिनिधी ) डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त पदभार येथील शल्य चिकित्सक डॉ. ऋत्विक जयकर यांच्याकडे देण्यात आला आहे.


३० जून रोजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या झालेल्या रिक्तपदी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्य चिकित्सा शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. ऋत्विक जयकर

यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत अधिष्ठातापदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.


याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्वेतांबरी खडे यांनी काढला आहे. डॉ. जयकर यांचे एमबीबीएसचे शिक्षण सोलापुरात तर एम.एस.चे शिक्षण कराड येथे झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शल्य चिकित्सक म्हणून चांगले काम केले आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

0 Comments