सोलापूर (प्रतिनिधी) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवीन विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णादेखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी कोणतेही प्रयत्न न केल्याने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगत अनेक बोगस डॉक्टरांनी आपली दवाखाने थाटली असून कार्यालयात खुर्ची उबवणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय व अधीक्षक इतर यंत्रणा नेमकी काय करते?याची माहितीचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नसते त्यामुळे कूचकामी आरोग्य यंत्रणेला आव्हान देत बोगस डॉक्टरांचा नवीन विडी घरकुल येथे सूळसुळट वाढला असून जबाबदारी झटकणाऱ्या नवीन घरकुल च्या पोलीस अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसुतक नसल्याने आरोग्य विभागाकडे बोट दाखवून नामा निराळे होण्याची परंपरा पोलीसांनी देखील राखलेली दिसत आहे वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अपयश आलं असून सोलापूर जिल्हा बोगस डॉक्टर मुक्त होण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा तक्रारी प्रशासन दरबारात केल्या होत्या इतकंच काय तर उपोषण देखील लावण्यात आलं होतं परंतु आरोग्य विभागाने केवळ कारवाई चे थातूर मातुर आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती आता तसं होणार नाही नवीन विडी घरकुल मधील बोगस डॉक्टरवर कारवाई करून दवाखाने कायमस्वरूपी बंद न केल्यास जेष्ठ पत्रकार यशवंत पवार पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे दिसत असून एकंदरीत नवीन विडीघरकुल मधील बोगस डॉक्टरांचा विषय अनेकांच्या अंगलट तर येणारचं त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं निलंबन खातेनिहाय चौकशी व अन्य जिल्ह्यात बदली बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार ठाम असल्याचे दिसत असून बोगस डॉक्टर विषय चांगलाच पेट घेणार असं दिसतंय.
0 Comments