रंजन कुमार शर्मा पुणे शहर सह पोलीस आयुक्त.पदी नियुक्ती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 


भारतीय पोलीस सेवेतील तब्बल १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत.

यात रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.

रंजन कुमार शर्मा हे भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी आहेत. 

काही महिन्यांपूर्वी शर्मा यांनी पुण्यात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता. 

सध्या ते नाशिक पोलीस परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक होते.

 हसतमुख अधिकारी म्हणून रंजन शर्मा यांची ओळख आहे. 

त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सी.आय.डी.) अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. 

आता त्यांची पुणे शहर सह पोलीस आयुक्तपदी बदली झाली.

Post a Comment

0 Comments