महापालिका नूतन आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मजरेवाडी आरोग्य केंद्रात वटपोर्णिमेनिमित्त वटवृक्षासह विविध रोपांचे वृक्षारोपण संपन्न

 


सोलापूर | प्रतिनिधी - महाराष्ट्रात साजरा केला जाणारा महिलांचा आवडता आणि महत्त्वाचा सण म्हणजे वटपोर्णिमा हा सण या सणाला धार्मिक जोड दिली जाते विशेषतः हिंदू स्त्रिया हा सण जन्मोजन्मी म्हणजेच ७ जन्मी हाच नवरा मिळावा या आशयाने हा सण साजरा केला जातो तर काही ठिकाणी या सणाला वैज्ञानिक जोड देखील दिली जाते. सध्याच्या काळात झाडांची कमतरता शहर राज्य व देशभरात जाणवत आहे त्यामुळे वातावरणात निसर्गात देखील वेळी अवेळी मोठे बदल होताना दिसत आहेत यामुळे झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन शुक्रवारी वटपोर्णिमेचे औचित्य साधून सोलापुरातील मजरेवाडी आरोग्य केंद्रात वटवृक्षासह विविध रोपे लावून रुक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर महापालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने तसेच राष्ट्रवादीच्या सायरा शेख सह आरोग्य केंद्रातील कर्मचारी आशा वर्कर्स आदी उपस्थित होते. 


  सदरील कार्यक्रम आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शैला सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रम प्रसंगी डॉ.राखी माने यांनी झाडाचे महत्त्व सांगत आरोग्य बाबत सर्वांनी काळजी घ्यावे सोलापूर शहरात विविध भागात आरोग्य केंद्रात नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यादरम्यान केले पुढे बोलताना मजरेवाडी आरोग्य केंद्रात पाहणी केलं असता सर्वकाही व्यवस्थित साफसफाईची व स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली आहे केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सरोदे यांचे येथे वटवृक्षा सारखे फारच वट दिसते म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला कारण केंद्र इतका स्वच्छ आणि कर्मचारी देखील उत्तम रीतीने काम पार पाडत आहेत असेही डॉ.माने म्हणाले.

Post a Comment

0 Comments