प्रवेश प्रक्रियेमध्ये १० टक्के मराठा आरक्षण सर्व महाविद्यालयांत नामंजूर १० टक्के आरक्षणाची पालकमंत्र्यांकडे मागणी



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू असून, शहरातील व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी शासनाने मंजूर केलेल्या दि. २६ फेब्रुवारी-२०२४ चे १० टक्के मराठा आरक्षण (SEBC) सर्व महाविद्यालयात नामंजूर करण्यात आ- लेले आहे.

मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण दाखले मिळणे बंद झाले आहे. या निवेदनाद्वारे विनंती करतो की, आत्ता अकरावीची झालेली सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द करुन नव्याने १० टक्के मराठा आरक्षणाचा समावेश करुन प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आदेश आपण दयावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात मराठा समाजाला ५० टक्के च्या आतून एसबीईसी मधून मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्यावे, मराठा भवन व ५०० मुलींचे वसतीगृह आपल्या शासनाकडे प्रलंबित असून, तातडीने मंजूर करणेबाबत पुढाकार घ्यावा. सोलापूर जिल्ह्याला असलेले एकमेव १०० टक्के शासन अनुदानीत आयुर्वे द महाविद्यालय हे १०० टक्के अल्पसंख्यांक कोटा केला आहे; तो रद्द करण्यात यावा. या परिक्षेची CBI मार्फत चौकशी करावी, समाजामध्ये मराठा व OBC समाज बांधवामध्ये गैरसमज पसरवून वाद लावण्याऱ्या समाज कंटकांचा बंदोबस्त करावा आदींसह इतर काही मागण्या करण्यात आल्या आहेत .

                   *चौकट*

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण कशाप्रकारे डावलले आहे. हे आज पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ शैलेंद्र देवळाणकर शिक्षण संचालक उच्च शिक्षण यांना तातडीने आदेश देऊन एक तर प्रवेश प्रक्रिया रद्द करावी अन्यथा दहा टक्के वाढीव जागा मराठा समाजासाठी द्याव्यात, असे आदेश द्यावेत. या गंभीर प्रकाराची दखल न घेतल्यास सकल मराठा समाज सर्व महाविद्यालयांच्या बाहेर निदर्शने करणार असल्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments