डॉ संजीव ठाकूर डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैधकीय महाविद्यालयात अधिष्ठता म्हणून रुजू



 सोलापूर (प्रतिनिधी ) डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सदानंद भिसे, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांच्याकडे शासन आदेश दि.१३.०२.२०२४ अन्वये सोपविण्यात आला होता.

२. बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून शासन पत्र दि.१०.११.२०२३ अन्वये काढून घेण्यात आला होता. त्यानुषंगाने डॉ. संजीव ठाकूर यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल केलेल्या मुळ अर्ज क.३८२/२०२४ मध्ये होणाऱ्या आदेशास अधिन राहून त्यांची डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील अधिष्ठाता पदावर पदस्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Post a Comment

0 Comments