सोलापूर: पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त १ व २ यांनी शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची यादी काढून त्यांना शहरातून हद्दपार केले होते. याबाबत सोलापुरातील मे. न्यायालयात आरोपींच्या वतीने रिविजन अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी सुनावणी दरम्यान जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मे. न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आरोपींवर एकापेक्षा अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असून समाजात दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था यामध्ये बाधा पोहोचू नये , यासाठी आरोपींना शहरातून हद्दपार करण्यात यावे असा युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर व आरोपींच्या वतीने मे .न्यायालयात ऍड. संतोष न्हावकर यांनी आपले म्हणणे मे. न्यायालयात मांडले.
यानंतर मे .न्यायालयाने जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंग राजपूत यांनी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून रेकॉर्डवरील 32 गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपींच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, ऍड पी .पी नवगिरे, ऍड. जे .ए. दर्जी, ऍड . रियाज शेख, ऍड. अजमुद्दीन शेख यांनी काम पाहिले….
*हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी पुढील प्रमाणे*
१) अजहर रामपूर,
२) रियाज हुंडेकरी
३) मोहसीन बागवान
४) मैनोद्दिन हत्तूरे
५) वाहिद विजापूरे
६) इलियास हुंडेकरी
७) गाझी जाहगिरदार
८) वाजिद सालार
९) आसिफ तुळजापूरे
१०) इफ्तिकार तुळजापूरे
११) कमरुल शेख
१२) मोहसिन नदाफ
१३) सादिक कुरेशी
१४) अलिमुद्दिन कुरेशी
१५) अल्ताफ कुरेशी
१६) इब्राहिम कुरेशी
१७) मतिन शेख
१८) मोहम्मद उस्ताद
१९) तौफिक शेख
२०) सोहेल कुरेशी
२१) इरफान शेख
२२) तौफिक हत्तूरे
२३) अंबादास करगुळे
२४) गौस नालबंद
२५) आरिफ नालबंद
२६) मौनोद्दिन नाईकवाडी
२७) अबूबकर नाईकवाडी ऊर्फ सय्यद
२८) तौसिफ नाईकवाडी
२९) शहानवाज नाईकवाडी ऊर्फ सय्यद
३०) उमर नाईकवाडी
३१) अबूरिहान नाईकवाडी व
३२) मकबूल नाईकवाडी इत्यादी
0 Comments