पाऊले चालती पंढरीची वाट !! पत्रकार सुरक्षा समिती प.महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने यांच्यावतीने श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत आणि प्रसाद वाटप मोठ्या उत्साहात संपन्न.




सोलापूर / मंगळवेढा :- आषाढी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यासमोर येणारं चित्र म्हणजे पांडुरंग. आषाढी वारी हा सोहळा मोठ्या भव्य स्वरूपात असा सालाबाद प्रमाणे लाखो वारकरी आणि भक्तगण यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून वारकरी वैष्णव बांधव हे पंढरपूरला येत असतात संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक आषाढी यात्रेला येत असतात महाराष्ट्रातून पंढरपूरकडे विविध पालख्यांचे आगमन होतात त्यातच मुख्य पालखी म्हणजे श्री संत गजानन महाराज पालखी जी शेकडो किलोमीटर वरून वेगवेगळ्या मार्गावरून पंढरीची वाट धरत शेकडो वारकरी पालखी सोबत पायी चालत असतात. ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची दरम्यानच्या काळात विविध संस्था संघटना पक्ष यांच्याकडून पालखी सोबत पायी चालत जाणाऱ्या वारकरी संप्रदायाला एक मोलाचं वाटा आणि पुण्याचं काम समजून सर्वत्र प्रसाद वाटप अथवा महाप्रसाद वाटप केले जाते त्याच अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील बुलंद आवाज युवा पत्रकार , पत्रकार सुरक्षा समिती चे पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष तानाजी माने यांनी 

मंगळवेढा अमोल कणीग उद्योग येथे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत


करत सोबत आलेल्या वारकऱ्यांना प्रसाद आणि पाणी चे वाटप केले याप्रसंगी वारकरी संप्रदाय आणि स्थानिकांमध्ये मोठे भक्तिमय आणि आनंदी वातावरण होते यावेळी सिद्राम वाघमारे संजय वाघमारे श्रावण वाघमारे शिवाजी डांगे पांडू जाधव विश्वनाथ भिसे शुभम माने राहुल वाघमारे बसवराज वाघमारे रोहित वाघमारे प्रशांत कांबळे विजय जाधव बंडू शिंगाडे मिस्त्री शिवाजी शेंडगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments