Type Here to Get Search Results !

नातेवाइकांकडे राहून घरफोडी करणारे दोघे जेरबंद घरफोडीत कटावणीचा करायचे वापर चोरीचे दागिने घेणारा सोनारही अडकला




सोलापूर(प्रतिनिधी ) ग्रामीणमधील नातेवाईकांकडे रहायला आल्यानंतर पूर शहरात येऊन बंद घरे फोडणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या ने जेरबंद केले आहे. घरफोडीतील संशयित रुपाभवानी मंदिराजवळ होते. पोलिसांनी सिद्धू श्यामराव रा. चिंचोली एमआयडीसी, ता. ८) व बजरंग नागनाथ चव्हाण (रा. रोड, जत) या दोघांना पकडले.

मागील महिन्यात सोलापूर शहरातील पाच घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तीन ९० हजार ४०० रुपयांचे दागिने केले आहेत.


सोलापूर शहरातील जोडभावी पेठ

व एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येकी दोन घरांमध्ये आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती.


त्याअनुषंगाने चोरट्यांचा शोध पोलिस घेत होते. खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी रूपाभवानी मंदिराजवळ सापळा रचला आणि त्यात सिद्धू काळे

व बजरंग चव्हाण दोघे अडकले. त्यांना अटक करून पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावेळी कटावणीच्या  साहाय्याने शहरातील बंद घरे फोडून ६२ हजारांची रोकड व ९६ ग्रॅम दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.