अंमली पदार्थांची तस्करी 5 किलो 370 ग्रॅम गांजा जप्त तिघे अटकेत फौंजदार चावडी पोलीस ठाणे डीबी पथकाची दमदार कारवाई.




सोलापूर (प्रतिनिधी ) .११/०१/२०२५ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत सपोनि/शंकर धायगुडे, व सोबतचे पोलीस पथकातील पोहेकॉ/१२३२ चुंगे, पोकॉ/२९२ चव्हाण, पोकॉ/१४५६ बडुरे, पोकॉ/१६०४ व्हटकर, पोकॉ/१८३८ पुजारी, पोकॉ/१७१० दराडे असे मिळुन फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना सेवासदन शाळेच्या कंमाऊन्ड लगत असलेल्या बोळात तीन इसम त्यांचे हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशव्यामध्ये त्यांनी आणलेल्या वस्तु संशयास्पद रित्या घेवून जात असताना मिळुन आले. त्यांचा संशय आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देवुन पळुन जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्याचेबाबत संशय बळावल्याने डी बी पथकाने त्यांना ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे १) अविनाश राहुल जाधव वय १९ वर्षे, रा. नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर सध्या रा. सालीगांव, ताब्रावाडा, म्हाफ्सा, नॉर्थ गोवा, २) सुजल सुधीर खरे वय १९ वर्षे, रा.१३४ बुधवार पेठ, मिलींद नगर, सोलापूर ३) अजय आनंद देऊस्कर वय २४ वर्षे, रा.घर नं.४१६ सालीगांव, ताब्रावाडा, म्हाफ्सा, नॉर्थ गोवा, असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या हातातील पिशवीची पाहणी केली असता पिशव्यामध्ये अनुक्रमे १) १८७६ ग्रॅम गांजा, २) १६८८ ग्रॅम गांजा, ३) १८०६ ग्रॅम गांजा असा एकुण ५३७० ग्रॅम वजनाचा गांजा त्यांची एकुण किमंत ९६,६००/- रुपये हा अंमली पदार्थ गांजा, अवैधरित्या संगणमताने विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले सदर इसमा विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), २९ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे सहा. पोलीस आयुक्त विभाग १, प्रताप पोमणवरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुपोनि तानाजी दराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह/अजय पाडवी, पोह/प्रविण चुंगे, पोना/आयाज बागलकोटे, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/कृष्णा बडुरे, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/विनोदकुमार पुजारी, पोकॉ/शशिंकात दराडे, पोकॉ/नितीन मोरे, पोकों/अजय चव्हाण, पोकॉ/अमोल खरटमल, पोकॉ/सुधाकर माने, पोकॉ/अतिश पाटील, पोकॉ/अर्जुन गायकवाड, पोकों/तोसीफ शेख, पोकॉ/विनायक जाधव पोकॉ/पंकज घाडगे, पोकॉ/सचिनकुमार लवटे, पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड, यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments