तडीपार फेम सिंघम पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची बदली रद्द झाल्याने जोर का झटका चा अनुभव घेतलेल्या गुन्हेगारांना भरली धडकी.




सोलापूर (प्रतिनिधी ) सज्जनांचा आधार तर दुर्जनांचा कर्दनकाळ समजले जाणारे सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरलेले तडीपार फेम सिंघम सोलापूर चे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची करण्यात आलेली बदली रद्द झाली असून, त्यांना पुन्हा सोलापूर पोलिस आयुक्तालयाकडे पदस्थापना देण्यात आली आहे. २७ जून रोजी त्यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्त पदावर विजय कबाडे यांची बदली झाली होती. सोमवारी (ता. ७) राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील १३ व राज्य पोलिस सेवेतील पाच अशा १८ अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदलीने सुधारित पदस्थापना दिली आहे. त्यात उपायुक्त विजय कबाडे यांना पुन्हा विद्यमान पदावर म्हणजे सोलापूरच्या पोलिस आयुक्तालयात उपायुक्त पदावर पदस्थापना दिली गेली असून तडीपार फेम सिंघम पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी झालेली बदली रद्द झाल्याने गुन्हेगारांना जोर झटका मिळाला असून अनेकांना धडकी भरली आहे.

Post a Comment

0 Comments