स्वरा गोल्डन म्युझिकल प्रस्तुत अनिल कोकाटे आयोजित ये शाम मस्तानी गाण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न



सोलापूर - राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या हिंदी सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम 🎷             "ये शाम मस्तानी"

रविवार दिनांक 07 जुलै 2024 रोजी

ब्रिजधाम आश्रम, सोरेगाव, सोलापूर

या ठिकाणी *सायंकाळी 5 ते 7* या वेळेत अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन श्री. अनिल कोकाटे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. संदिप कोकाटे यांनी केले.

या कार्यक्रमास सोलापुरातील गायक

श्री. अनिल कोकाटे,श्री. सचिन जतकर,

सौ. मंगल सुरवसे, श्री सचिन वाकडे, सौ. संगीता कोळी, सौ. रेणुका म्हमाने, सौ. शोभा वाघमारे, श्री. उमाकांत हुच्चे, श्री. नंदकिशोर कटकधौंड, सौ. संजीवनी सिद्धगणेश, सौ. रेखा पवार, श्री. सुहास माने, श्री. प्रभाकर मालगत्ते, श्री. महेश उजळंबे इत्यादी गायक/ गायिकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments