नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने वृक्षारोपण व वृक्षलागवड



प्रतिनिधी(अमर पवार.)

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जुलै 2024 रोजी पंढरपूर व सांगोला येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्यात आले. यामध्ये रेल्वे मैदान पंढरपूर, पंतनगर वाखरी बायपास, वाहन तळ इसबावी. या ठिकाणी एकूण 990 वृक्ष लागवड करण्यात आली. हे वृक्ष लागवडीचे कार्य सकाळी आठ ते 11 वाजे पर्यंत करण्यात आले.या वृक्ष लागवडीसाठी सुमारे 2100 श्री सदस्य स्व इच्छेने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी श्री प्रशांत जाधव, सुनील वाळूजकर, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग श्री भीमाशंकर मेटकरी या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली.



          सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी सुमारे 219 वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये सुमारे 400 श्री सदस्य स्व इच्छेने सहभागी झाले होते. सांगोला येथे वृक्ष लागवडीसाठी मार्केट कमिटी श्री महेश वाघमारे, नगरपालिका आरोग्य विभाग निरीक्षक श्री विनोद सर्वगोडे , नगरपालिका वृक्ष प्राधिकरण हरप मुलाणी या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडीत सुरुवात झाली.या वृक्ष लागवडीसाठी मोहोळ, पंढरपूर ,सांगोला, करमाळा ,माळशिरस, मंगळवेढा,माढा, या तालुक्यातील श्री सदस्य स्व इच्छेने सहभागी झाले होते.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, जल पुनर्भरण, स्वच्छता मोहीम असे समाजकार्य राबवले जाते.

Post a Comment

0 Comments