सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर येथील सहा.कामगार आयुक्त कार्यालय सध्या मरीआई चौक, दमाणी नगर, कामगार कल्याण मंडळ कार्यालय येथे स्थित आहे. वास्तविक हे कार्यालय कामगार वसाहतीपासून ६ कि.मी. अंतरावर आहे. या कार्यालयाला कार्यालयीन कामकाजासाठी जाणे कामगारांना जिकीरीचे व खर्चिक आहे. सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, नोंदणी तसेच कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगारांच्या तक्रारी, औद्योगिक कलह अशा वेगवेगळ्या कामगारांशी निगडीत कामांसाठी कार्यालयाला जाणे क्रमप्राप्त व अपरिहार्य असते. परंतु संघटीत-असंघटीत कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, विडी कामगार, रेडीमेड व शिलाई कामगार यातील बहुतांश कामगार हे अशिक्षित, अर्धशिक्षित असल्यामुळे त्यांना कार्यालयाशी संपर्क करणे अवघड असते. अशातच सदरचे हे कार्यालय शहरापासून जवळपास १५ कि.मी. अंतरावर स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत मिळालेली आहे. यामुळे कामगारांचे व वेगवेगळ्या कामगार संघटना यांना देखील कार्यालयीन कामकाजासाठी गैरसोय होणार आहे. याची नोंद घेऊन स्थलांतर रोखले पाहिजे या संबंधी राज्य कामगार आयुक्त यांना निवेदन सादर केले असून या संबंधी योग्य निर्णय घेण्यात यावे अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावे लागेल अशी भूमिका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर अशी प्रतिक्रिया व्यक्त केले.
सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सहा.कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना सिटू च्या वतीने निवेदन देण्यात आले.या वेळी ॲड.अनिल वासम ,अमित मंचले यांची उपस्थिती होती.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्यास्थित दमाणी नगर कामगार कल्याणकारी मंडळ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय एम.आय.डी.सी. चिंचोळी येथे स्थलांतरीत न करता आहे त्या ठिकाणीच सुरळीत चालू ठेवावे अथवा कामगारांच्या वस्तीजवळ किंवा नुकतेच मा. जिल्हाधिकारी यांचे जिल्हापरिषद येथून अन्यत्र स्थलांतरीत झाल्याने सदरची ती इमारत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास शासन स्तरावर प्रयत्न केल्यास उपलब्ध होईल. जेणेकरून कामगारांना सहज सुकर कार्यालयीन कामकाजाची सेवा उपलब्ध होईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी, हि नम्र विनंती.
0 Comments