चोरट्याकडून सहा मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच मोटारसायकली चोरनाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली तर दोन विधीमंधर्षग्रस्त बालकांनाही पोलिसांनी पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असून त्यांच्याकडूनही एक मोटारसायकल जप्त केली 

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना घरफोडी करणाऱ्या व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी शाहरुख ऊर्फ आलम महमद इसाक तांबोळी (ता. मुळेगाव रोड, सरवदे नगर), सूर्यकांत अप्पा यलगर (जयप्रकाश नारायण नगर, मुळेगाव रोड, जुना विडी घरकूल) व सैफन नुरूद्दीन बागवान (रा. किसान नगर, अक्कलकोट रोड) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. शाहरुख इसाक व सैफन बागवान या दोघांकडून  प्रत्येकी एक मोटारसायकल तर सूर्यकांत यलगर यांच्याकडून चार मोटरसायकली जप्त केल्या चोरट्याकडून पोलिसांनी एकूण एक लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या नेतृत्वखाली पोलीस हवालदार राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड आमसिद्ध निंबाळ दीपक गायकवाड शंकर याळगी काशिनाथ वाघे भारत तुक्कूवाले सुहास अर्जुन अमोल यादव अजित माने देविदास कदम अमर शिवसिंगवाले यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments