मुख्यमंत्र्यांचे लाडके सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल.



सोलापूर(प्रतिनिधी ) महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आकाश कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सिव्हिल इंजिनिअर आहे. मी सोलापुर महानगरपालीकेतील निघणानाऱ्या वेगवेगळया कामांची निविदा भरुन कामे मिळवुन ठेकेदार म्हणुन कामे करतो. सध्या एमआयडीसी हद्दीमध्ये ड्रेनेज लाईनचे टेंडर सोलापुर महानगरपालिका वतीने निघाले आहे माझ्यासह इतर ५ जणांनी सदरचे टेंडर भरलेले होते. सदर ड्रेनेजचे रेडिंगचे कामावर सोलापुर महानगरपालिकेचे दिपक रामचंद्र कुंभार या इंजिनिअरची देखरेख आहे. दि.०१/०७/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा. इंजिनिअर दिपक रामचंद्र कुंभार हे मला मनीष काळजे यांचे सात रस्ता येथील ऑफिसमध्ये घेवुन गेले. तेथे मनीष काळजे हा मला "एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापुर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे, किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रुपये असुन, त्याचे १५ टक्के प्रमाणे ११ लाख रुपये तुला मला दयावे लागतील" असे म्हणाला. मी त्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला दमदाटी व शिवीगाळ करुन तुला काम कसे मिळते पाहतो, तुला मी अधिकाऱ्यांना सांगुन डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली. त्यानंतर मी तेथुन निघुन आलो. आज दि.०२/०७/२०२४ रोजी दुपारी १२:०० महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांचे समवेत सोलापुर महानगरपालिका येथे त्यांचे विभागाचे सहायक अभियंता श्री रामचंद्र पेंटर यांचेकडे एमआयडीसी सोलापुर येथील वर्क ऑर्डरची निविदा मंजुर झाली अगर कसे? हे पाहण्यासाठी गेलो असताना, तेथे मनीष काळजे सोबत असणारा इसम राजेंद्र कांबळे हा तेथे हजर होता. त्यांने मनीष काळजे यांना मी येथे आल्याचे फोन करुन सांगितले. त्यावरुन मनिष काळजे व त्याचा ड्रायव्हर व एक अनोळखी साथीदार असे तेथे आले त्यावेळी तो माझेशी, पेंटर साहेब तसेच कुंभार साहेब यांचेशी कामा बाबतीत चर्चा करु लागला. चर्चे दरम्यान मी त्यांचे ऐकत नाही याचा राग येवुन त्यांने मला दोन्ही हातांने माझे तोंडावर चापटा मारल्या त्यावेळी दिपक कुंभार यांनी मनिष काळजे यास ऑफिसमध्ये काही करु नका असे म्हणुन बाजुला केले. त्यानंतर मनिष काळजे यांने " तु एमआयडीसीचे ड्रेनेजची निविदा काढुन घे किंवा प्रोटोकॉल प्रमाणे मला दे" असे म्हणुन तुला सोलापुरात राहु देत नाही अशी धमकी दिली. मी त्यास पुन्हा नकार दिला असता, मनिष काळजे यांने व त्याचे सोबतच्यां ड्रायव्हरने मला शिवीगाळी करुन हातांने व लाथा बुक्क्यांने मारहाण केली,असल्याचे तक्रारी मध्ये नमूद केलं आहे.

Post a Comment

0 Comments