जिल्हा परिषद शिक्षिका रिंकू जाधवर (धस )यांचा खरोखरच समाजाने घ्यावा असा आदर्श उपक्रम



  अक्कलकोट - मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांनी जोपासली शैक्षणिक पालकत्वाची संकल्पना


प्रयोगशील आदर्श उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रिंकू जाधव यांनी मुलींच्या स्वाभिमानी स्वावलंबी शैक्षणिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अत्यंत हुशार व गरजू अशा कमीत कमी दहा मुलींच्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली . गेल्या सहा वर्षांपासून शैक्षणिक पालकत्व या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे . दहा मुलींची निवड करून वर्षभराच्या दप्तरासह संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप त्या करतात . वर्षभरात विद्यार्थिनींच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार संपूर्ण शैक्षणिक साहित्य त्या स्वखर्चाने पुरवतात.

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट न राहता त्या स्वावलंबी व सक्षम बनतील एक मुलगी शिकली म्हणजे दोन कुटुंब पर्यायाने समाज व देश घडवण्यात मुलींचा सहभाग वाढेल मुलींचे सक्षमीकरण करण्यास त्यांना स्वावलंबी बनवण्यास त्यांचा हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Post a Comment

0 Comments