सोलापूर (प्रतिनिधी) बाळे टोल नाक्याजवळील
लॉजवर घडलेल्या कथित बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेची पोलिस प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील सर्व लॉज चालकांना नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन व्यक्तींना प्रवेश न देणे, प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड नोंदवणे यासारख्या बाबींचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये लॉजिंग व्यवसायाचे पेव फुटले आहे. विशेषतः बाळे टोल नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात
लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याने तालुका पोलीस ठाणे प्रकाश झोतात आले असून विशेष म्हणजे या परिसरात कुठलेही पर्यटन क्षेत्र नसताना, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून लांब असतानाही हा व्यवसाय येथे जोमात सुरू आहे. याचे कारण शहरातील अनैतिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांसाठी हा भाग म्हणजे नंदनवन झाला आहे. यामध्ये कॉलेज
तरुण तरुणींसाठी समावेश आहे. या अवैध प्रकारातूनच गेल्या आठवड्यात तेथील एका लॉजवर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेवरून सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलीस
प्रशासनाबाबत गंभीर आरोप करण आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिस ठाणे प्रशासनाच्या वतीने कार्यक्षेत्रातील सर्व लॉज चालकांची मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉज चालकांना लॉजच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना केल्या आहेत त्याचबरोबर लॉजमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद व त्याचा आधार कार्डचा क्रमांक रजिस्टर नोंदवणे अनिवार्य असल्याच्या दिल्या. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्ती बद्दलची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याविषयी बैठकीत सूचना करण्यात आल्या.
0 Comments