सोलापूर (प्रतिनिधी) येथील सदर बझार पोलिस ठाणे आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या खात्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित
लकडे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत तर फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर नेमता येणार नाही, त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त करावे, असे आदेश गृह विभागाने १ मे २०२५ रोजी काढले
होते. या आदेशानुसार आता कार्यवाही झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सदर बझार पोलिस ठाण्याचा पदभार नामदेव बंडगर यांच्याकडे तर फौजदार चावडी पोलिस ठाण्याचा पदभार अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
0 Comments