Type Here to Get Search Results !

दररोज ६ ठिकाणी नाकाबंदी अन् २ तास पायी गस्त सोलापूर शहर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यावर करडी नजर वरिष्ठ अधिकारी अचानक देणार भेटी चुकीला माफी नाही.




सोलापूर (प्रतिनिधी ) सार्वजनिक रस्त्यावरील टवाळखोरी, किरकोळ भांडण वादावादी छेडछाड आणी दोन गटातील हाणामारी अशा घटना वाढल्याने सोलापूर शहरात आता नाकाबंदी व गस्त वाढवण्यात आली आहे. दररोज शहरातील सहा ठिकाणी किमान दोन तास अचानक नाकाबंदी आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे.


रात्री आठ वाजता पोलिस अंमलदारांच्या ड्यूटी बदलतात आणि त्यामुळे रस्त्यांवर पोलिस दिसत नाहीत. सोलापूर शहरात आठ ते दहा या वेळेतच


वादावादी, भांडणे झाल्याचे अलीकडे पाहायला मिळाले. ड्यूटी बदलत असल्याने सगळेजण पोलिस ठाण्यात हजेरीसाठी जातात आणि डयूटी संपलेले घराच्या दिशेने निघतात. त्यावेळी गुन्ह्यांची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे आता रात्री ८ ते १० या वेळेत नियमितपणे प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागात तथा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालतील.


पोलिस अंमलदार देखील असणार आहेत. पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तही तेथे भेटी देऊन पाहणी करतील. त्यातून गुन्हे घडणार नाहीत, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे

------------------------------------------------------------

रात्री आठ ते दहा या वेळेत सार्वजनिक ठिकाणी विविध कारणांमुळे वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे या वेळेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक या वेळेत पायी गस्त घालतील. त्यावेळी पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त देखील भेट देतील. दुपारी किंवा सायंकाळी, रात्री कधीही शहरात नाकाबंदी लावली जाईल, त्यावेळी मद्यपींसह अन्य बेशिस्तांवर कारवाई केली जात आहे. -

 विजय कबाडे पोलिस उपायुक्त सोलापूर शहर

-----------------------------------------------------------

     दररोज तीन तास अचानक नाकाबंदी

मद्यपान करून वाहने चालविणारे, फॅन्सी नंबरप्लेट लावून वाहने फिरविणारे, चोरीची दुचाकी चालविणारे किंवा गर्दीतून महिलांची चेन स्नॅचिंग करणारे, अशांवर लक्ष ठेवण्यासाठी आता दररोज शहरात नाकाबंदी लावली जाणार आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी किंवा रात्री अशा कोणत्याही वेळी म्हणजेच अचानकपणे शहरातील विविध सहा ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असणार आहे त्याठिकाणी एक पोलीस निरीक्षक दहा अंमलदार असतील आणी त्यामध्ये तीन वाहतूक पोलीस असणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.